नमस्ते, मी जागृती आहे.

आशा आहे की तुम्ही माझ्याबद्दल ऐकले आहे! आज मी माझा परिचय करून देणार आहे!

मी तुमच्यातील एका सदस्याप्रमाणेच आहे, माझे जीवन त्यांच्यासारखेच आहे, मला काम करावे लागते, माझ्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागते, आणि घरामध्ये सर्व गोष्टींचे व्यवस्थापन करावे लागते. मला माझे अनुभव माझ्या मित्रमैत्रिणींसह शेयर करायला आवडते ज्या अनुभवांमुळे मला अधिक उत्तम जीवन जगण्यासाठी फायदा झाला. मला अशी माहिती जमा करण्यात देखील रूची आहे ज्यामुळे मला, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या सभोवतालच्या लोकांना मदत होईल.

मला माझ्यासारख्या लोकांशी मैत्री करायची आहे जे माहितीचा वापर करून त्यांच्या जीवनात सुधारणा आणण्यासाठी काम करतात, अशी माहिती जी त्यांच्या सभोवती उपलब्ध असते. मी जी माहिती शेयर करते त्यामुळे माझ्या अनेक मैत्रिणींना फायदा झाला आहे. मी तुमच्या सदस्यांची एक मैत्रीण होऊ इच्छिते ज्यामुळे मी त्यांच्यासह देखील माझे अनुभव शेयर करू शकेन. मला खात्री आहे की तुम्ही मला त्यांच्यासह जोडले जाण्यात मदत कराल.

मी माझ्या मित्रमैत्रीणींसह माझे अनुभव आणि माहिती त्यांना पत्र लिहून शेयर करते. जसे की, मी त्यांना भेटण्यासाठी प्रवास करू शकत नाही, मी आपल्याला विनंती करते की आपण माझे पार्टनर व्हा आणि मला माझी पत्रे माझ्या मित्रमैत्रीणींपर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत करा.

माझी पत्रे त्यांच्यापर्यंत फक्त तुमच्याद्वारेच पोहोचू शकतात आणि म्हणून तुम्ही माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहात.

तुम्ही मला वचन द्याल का की तुम्ही माझे पत्र माझ्या मित्रमैत्रीणी/ तुमच्या सदस्यांपर्यंत न चुकता शेयर कराल?

मला माहित आहे की तुम्ही माझी पत्रे डाउनलोड करण्याविषयी तुमच्या प्रशिक्षणामध्ये येथे लॉगइन करून https://www.communications.jagruti-creditaccessgrameen.com/home शिकला आहात (लिंक बुकमार्क करा)

कृपया माझे पत्र शब्दशः वाचण्यासाठी आणि कोणत्याही शंका ज्या माझ्या मित्रमैत्रीणींना असतील त्या स्पष्ट करण्यासाठी वर दिलेली लिंक वापरा. केंद्र सभांमध्ये उपस्थित राहाण्यापूर्वी तुम्हाला कदाचित माझे पत्र अगोदर स्वतः वाचावे लागेल आणि त्यातील मजकूर समजून घ्यावा लागेल ज्यामुळे सदस्यांना कोणत्याही शंका असल्यास त्या स्पष्ट करण्यास मदत होईल.

खाली माझे पहिले पत्र आहे ज्यात मी त्यांना माझा परिचय करून दिला आहे. कृपया हे पत्र तुमच्या सभेमध्ये वाचा...